spot_img
spot_img
spot_img

पैसे देण्यास नकार दिल्याने मामाकडून भाच्यावर जीवघेणा हल्ला

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून मामानेच आपल्या भाच्यावर सिमेंटच्या गड्ड्याने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना मोरवाडी परिसरात घडली. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण उमेश गायकवाड (वय 22, रा. लालटोपी नगर, मोरवाडी) हे 16 जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लालटोपी नगर परिसरात होते. त्यावेळी त्यांचा मामा रविंद्र आण्णा गायकवाड (वय 37) याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.

मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीने सिमेंटचा गड्डा फिर्यादीच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात किरण गायकवाड जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांनी आरोपी रविंद्र गायकवाड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 118(1) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!