पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
तळेगाव दाभाडे परिसरात सार्वजनिक ठिकाणी अनैतिक व्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायोनियर हॉस्पिटलसमोरील परिसरात संबंधित महिला रस्त्याच्या कडेला उभी राहून अश्लील हावभाव व शब्दांचा वापर करून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून तिचा शोध घेण्यात येत आहे.
सार्वजनिक ठिकाणी अनैतिक व्यवसाय आणि नागरिकांना होणारा त्रास रोखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


