spot_img
spot_img
spot_img

दाभाडे सरकार चौकातील चार दिवसांचा अंधार संपला!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चऱ्होली येथे दाभाडे सरकार चौक परिसरातील अलंकार सोसायटीमध्ये एलटी (LT) केबल खराब झाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने सोसायटीची पाणीपुरवठा व्यवस्था ठप्प झाली होती. तसेच लिफ्ट बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना दररोज त्रास सहन करावा लागत होता.

या गंभीर समस्येची माहिती मिळताच, भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी तातडीने महावितरणच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या सूचनेनुसार आणि प्रशासनाच्या समन्वयातून तब्बल 150 मीटर नवीन एलटी केबल टाकण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले.

केबल बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सोसायटीचा वीजपुरवठा सुरळीत झाला असून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. तसेच लिफ्टही कार्यान्वित झाल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चार दिवसांच्या या गैरसोयीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आमदार महेश लांडगे यांनी स्वतः लक्ष घालून प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्यामुळे समस्या तातडीने सोडविण्यात यश आले. त्यामुळे अलंकार सोसायटीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त करत आमदार लांडगे यांचे आभार मानले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही तडजोड न करता तत्परतेने काम करण्याची भूमिका आमदार महेश लांडगे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. त्यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे चार दिवसांपासून अंधार आणि गैरसोयीचा सामना करणाऱ्या अलंकार सोसायटीतील शेकडो रहिवाशांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.

“नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देणे ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. अलंकार सोसायटीतील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा आणि लिफ्ट सेवा बंद पडून नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब समोर आल्यानंतर संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधून नवीन एलटी केबल टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत.

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!