शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी – सोहम योग साधना, पवना ग्रुप आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाला मोठा प्रतिसाद मिळाला. ४५० साधकांनी सहभागी होत योगासने सादर केली.
चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिराशेजारील देऊळमळा मैदानात झालेल्या योगाला माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष रवी नामदे यांच्यासह साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिगंबर उचगावकर, अनुजा उचगावकर यांनी योगाचे धडे दिले. सूर्य नमस्कार , कंधारासन , मर्कटासन , द्वीपाद उत्तानपादासन, भुजंगासन, तिरयक भुजंगासन, शशांकासन, बधद कोनासन, ताडासन, वीरासन इत्यादी आसने तसेच कपालभाती , भाकरीचा, अनुलोम विलोभनीय , शितली शितकारी प्राणायाम करण्यात आले.


