spot_img
spot_img
spot_img

मोरवाडीत दुचाकीवरून अवैध मद्य वाहतूक; युवकावर दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

मोरवाडी परिसरात दुचाकीवरून अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एका युवकाविरुद्ध संत तुकारामनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत मद्यसाठ्यासह दुचाकी असा एकूण ९५ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जून रोजी रात्री मोरवाडी चौक ते सम्राट चौक दरम्यान स्पार्कल डेंटल क्लिनिकजवळ पोलिसांनी संशयावरून एका दुचाकीस्वाराची तपासणी केली. यावेळी शषांक राजेश नारंग (वय २३, रा. चिंचवड) याच्या ताब्यातून ५ हजार ३०० रुपये किमतीच्या देशी-विदेशी बिअरच्या बाटल्या तसेच स्कॉच व्हिस्कीची बाटली आढळून आली.

आरोपी हा ९० हजार रुपये किमतीच्या ज्युपिटर दुचाकीवरून हा मद्यसाठा विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!