पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
निगडी परिसरात अंमली पदार्थांविरोधातील कारवाईदरम्यान पोलिसांनी एका तरुणाला गांजासह ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८.२० वाजता राजनगर ओटा स्कीम परिसरातील नॅशनल गॅरेजसमोर, नॅशनल हेअर सलूनजवळ पोलिसांनी कारवाई केली. यावेळी सनी शंकर थोरात (वय २०, रा. सहयोगनगर, त्रिवेणीनगर रोड, निगडी) याच्या ताब्यातून सुमारे ४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त अंमली पदार्थाची किंमत सुमारे २ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस शिपाई विशाल रंगनाथ म्हस्के यांनी फिर्याद दिली असून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


