spot_img
spot_img
spot_img

‘जनता दरबार’चे आयोजन; विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“नगरसेवक आपल्या दारी” अभियानांतर्गत प्रभाग क्र. १६ चे नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांच्या वतीने रविवारी, १४ जून २०२६ रोजी “जनता दरबार” आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हा जनता दरबार सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत लिटील अर्थ, मासुळकर कॉलनी, बिल्डिंग सी-१८ येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास आमदार शंकरमाऊ जगताप यांचे मार्गदर्शन लाभणार असून आयोजन धर्मपाल यशवंत तंतरपाळे यांनी केले आहे.

या उपक्रमामध्ये नवीन रेशनिंग कार्ड, नवीन आधार कार्ड तसेच पत्ता बदल व दुरुस्ती, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड आदी सेवांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. तसेच २००२ च्या मतदार यादीतील नावांची पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आयोजकांनी नागरिकांना मतदान कार्ड, आधार कार्ड तसेच आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या योजनांचा लाभ शासकीय दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जनता दरबाराबाबत अधिक माहितीसाठी ९८२२४७५६९६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!