spot_img
spot_img
spot_img

मोशीत गांजा विक्रीसाठी साठा; २०० ग्रॅम गांजासह तरुणाविरुद्ध गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

मोशी परिसरात गांजा विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या एका तरुणाविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. कारवाईदरम्यान १० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास आदर्शनगर, मोशी येथील कल्याण कॉलनी क्रमांक १ परिसरातील कचरा डेपोजवळ गस्तीदरम्यान संशयित हालचाली करणारा अर्जुन थापा उर्फ विश्वकर्मा (वय १९) आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

प्राथमिक तपासात आरोपी हा गांजा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या जवळ बाळगत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८(क) व २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!