spot_img
spot_img
spot_img

सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला शिवप्रेमी संभाजी बारणे यांचा वाढदिवस

शबनम न्यूज | प्रतिनिधी

थेरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते, शिवप्रेमी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस संभाजी बारणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने साईराज सांस्कृतिक क्रीडा मित्र मंडळ, थेरगाव यांच्या वतीने थेरगाव रुग्णालयात गरीब व गरजू रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमात साईराज सांस्कृतिक क्रीडा मित्र मंडळाचे अध्यक्ष धैर्यशील जगताप-पाटील, उपाध्यक्ष भाऊसाहेब साळवे, खजिनदार गुरुदास डोके-पाटील, सहसचिव अशोक सातपुते यांच्यासह इसाक शेख, संदीप करंजे, सुरेश शिंदे, किरण साळवे, हनुमंत सुरोशे, आकाश कांबळे, बाबासाहेब वंजारी, संतोष गायकवाड, विजय पवार, रोहिदास कांबळे आणि अशोक गजर यांनी विशेष परिश्रम घेतले.

संभाजी बारणे हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नसून शिवचरित्र अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवचरित्राचे दुर्मिळ संकलन करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. तसेच १९८० ते २०२२ या कालावधीतील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या ओळखपत्रांचे संकलन करून २०१९ मध्येही त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळविले होते. दोन वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा विशेष गौरव केला जातो.

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या संभाजी बारणे यांनी आजपर्यंत अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. थेरगाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात त्यांचा मोलाचा पुढाकार राहिला आहे. परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणींना तत्परतेने धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

१२ जून रोजी असलेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही दिखाऊ कार्यक्रम न करता थेरगाव रुग्णालयात गरीब रुग्णांना फळे वाटप करून साध्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक कैलास बारणे, नगरसेविका योगिता बारणे, खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक विश्वजीत बारणे, नगरसेविका मनीषा प्रमोद पवार, माजी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सामाजिक कार्यकर्ते संदीप गाडे, प्रवीण बारणे, राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल बारणे, पत्रकार शबनम सय्यद यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी संभाजी बारणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.

“सामाजिक बांधिलकी, शिवप्रेम आणि लोकसेवेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्त्व” अशी भावना अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!