spot_img
spot_img
spot_img

ट्रक भाड्याने घेऊन परस्पर गायब; तिघांची लाखोंची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

वाहने भाड्याने घेऊन त्यांचे भाडे न देता तसेच वाहने परत न करता तिघांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार देहूगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर मारुती पडदुने (वय अंदाजे ४०) याने ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी फिर्यादी किरण तावरे यांचा आयशर ट्रक भाड्याने घेतला होता. मात्र डिसेंबर २०२५ पासून वाहनाचे भाडे न देता ट्रकही परत केला नाही. चौकशीत त्याने याच पद्धतीने इतर दोघांकडूनही मालवाहू वाहने भाड्याने घेऊन त्यांचे भाडे न देता वाहने स्वतःकडेच ठेवून फसवणूक केल्याचे समोर आले.

फिर्यादीसह इतर वाहनमालकांची आर्थिक फसवणूक झाल्याने देहूरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) व ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय जाधव करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!