spot_img
spot_img
spot_img

ओम प्रतिष्ठानतर्फे मोफत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

युवक-युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांना चालना देण्यासाठी चिंचवड येथील ओम प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेतर्फे सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट आणि लीडरशिप क्वालिटी डेव्हलपमेंट प्रशिक्षण वर्गाची सुरुवात करण्यात आली. या प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक मा श्री दिलीप सोनिगरा, समाजसेवक संजय कुलकर्णी आणि ओम प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा वनिता सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संवादकौशल्य, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संघभावना आणि वेळेचे व्यवस्थापन यांसारख्या कौशल्यांचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञानावर भर न देता स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अशा प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रभावी संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, सार्वजनिक वक्तृत्व, संघभावना आणि आत्मविश्वास वाढविणे या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. भविष्यातील शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात विद्यार्थ्यांना यशस्वी बनविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे वनिता सावंत यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत जेनेसिस टोस्टमास्टर्स क्लबच्या अध्यक्षा टोस्टमास्टर गिताली वायचळ यांनी विद्यार्थिनींसाठी “स्पीचक्राफ्ट (Speechcraft)” कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे मार्गदर्शन टोस्टमास्टर सरोश खान यांनी केले. त्यांनी विद्यार्थिनींना प्रभावी संवादकौशल्य, सार्वजनिक वक्तृत्व, आत्मविश्वास वृद्धी आणि व्यक्तिमत्त्व विकास याविषयी अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी टोस्टमास्टर गिताली वायचळ आणि टोस्टमास्टर जयदेव सर यांनी विशेष समन्वय साधला. त्यांच्या योगदानाबद्दल ओम प्रतिष्ठानतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या संपूर्ण जेनेसिस टोस्टमास्टर्स क्लब व टोस्टमास्टर्स टीमचे विशेष आभार मानण्यात आले.

कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर प्रशिक्षण वर्गास उत्साहात सुरुवात करण्यात आली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!