spot_img
spot_img
spot_img

कै. भिकू वाघेरे पाटील यांना ४० व्या स्मृतिदिनी अभिवादन; अॅड. एस. बी. चांडक यांना ‘पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार’ प्रदान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतिदिन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या प्रसंगी पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एस. बी. चांडक यांना ‘पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक बांधिलकी, लोकाभिमुख नेतृत्व आणि शहराच्या विकासातील योगदानाचा स्मरणपूर्वक उल्लेख केला.

कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, प्रथम नागरिक महापौर रविभाऊ लांडगे, उपमहापौर शैलजाताई बाबर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका स्वाती (माई) काटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष चेतन (अण्णा) पवार, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक अरुणभाऊ बोऱ्हाडे, नगरसेवक फजलभाई शेख, माजी नगरसेवक दत्तात्रय वाघेरे, हनुमंत नेवाळे, नरहरी कापसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब (आप्पा) वाघेरे, नानिकजी पंजाबी, गणेश ढाकणे, उद्योजक गणेशजी कुदळे, माजी नगरसेविका उषाताई वाघेरे, अनिताताई वाळुंजकर, शोभाताई मुंढे, कन्या विद्यालयाच्या प्राचार्या परदेशी मॅडम, दत्तात्रय मासुळकर, डॉ. पांडुरंग भोसले, अजय जयसिंग कापरे, पवना सहकारी बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, बिपीनशेठ नाणेकर, उद्योजक विजयशेठ काटे, दिलीपराव देवकर, यशवंत साखरे, काळूराम लांडगे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होते.

स्मृतिदिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या कार्याचा वारसा जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!