spot_img
spot_img
spot_img

पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म परिसरात १.5 लाख वृक्षांचे भव्य रोपण

 ‘देवराई’ विकास उपक्रमाचा शुभारंभ

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या वतीने पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म परिसरात सुमारे 92 प्रजातींच्या तब्बल 1.लाख वृक्षांचे रोपण करून या परिसरात देवराई विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. राज्य शासनाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक संदीप वाघेरे आणि विभागीय वन अधिकारी करजे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी पिंपरी गावातील सामाजिक कार्यकर्तेविविध धार्मिक संस्थांचे प्रतिनिधीवन विभागाचे अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना संदीप वाघेरे यांनी सांगितले कीमिलिटरी डेअरी फार्मच्या विस्तीर्ण जागेत विकसित होणारी ही देवराई शहरासाठी एक नवीन ‘हरित फुफ्फुस’ ठरणार आहे. वाढते प्रदूषण आणि शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा असून वृक्षसंवर्धनासाठी महापालिकेच्या तसेच स्वनिधीतून आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि मदत करण्यात येईलअसे आश्वासन त्यांनी दिले.

वन विभागाच्या या उपक्रमामुळे जैवविविधतेचे संवर्धन होण्यास मदत होणार असून विविध पक्षीप्राणी आणि वनस्पतींसाठी नैसर्गिक अधिवास निर्माण होणार आहे. तसेच भविष्यात हा परिसर पर्यावरण शिक्षणसंशोधन आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हाती घेण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात असून नागरिकांनीही वृक्षलागवड आणि संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावाअसे आवाहन यावेळी करण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!