spot_img
spot_img
spot_img

विक्रम काकडे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली. तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनीसुद्धा माघार घेतल्याने महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडणुकीसाठी छाननीनंतर ७ पैकी ६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. एका अपक्षाचा अर्ज बाद ठरला होता. राष्ट्रवादी (अजित पवार)चे विक्रम काकडे, राष्ट्रवादी (शरद पवार)चे श्रीकांत पाटील हे दोन अधिकृत उमेदवार असतील. डमी म्हणून अर्ज भरलेले राष्ट्रवादी (अजित पवार)चे सुनील टिंगरे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) चे तुषार कामटे हे माघार घेतील असे पक्षातर्फे सांगण्यात आले होते. तसेच अपक्ष म्हणून अर्ज भरलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद हेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून माघार घेतील असे ठरले होते.प्रत्यक्षात माघारीसाठी दोन दिवस असताना पहिल्या दिवशी बुधवारी एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली होती. अखेर शेवटच्या क्षणी या सर्व उमेदवारांनी माघार घेतली आहे. महायुतीचे विक्रम काकडे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!