spot_img
spot_img
spot_img

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा विश्वासघात; स्वबळाचा नारा देण्याचे संकेत – प्रशांत जगताप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विश्वासघात झाल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. या जागेवर काँग्रेसचा सर्वाधिक आकडा आणि मजबूत दावा असतानाही महाविकास आघाडीतील जागावाटपात ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांना देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

जगताप म्हणाले की, महाराष्ट्रातील १७ जागांपैकी पुणे आणि सातारा या दोन जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केल्यामुळे काँग्रेसने मोठ्या मनाने ही जागा सोडली. मात्र भाजप आणि महायुतीविरोधात लढण्याचा संदेश देण्याची संधी त्यामुळे काँग्रेसच्या हातातून गेली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अखेर माघार घेतल्याने हा काँग्रेससह मतदारांचाही विश्वासघात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भविष्यात अशा प्रकारे मित्रपक्षांकडून महायुतीसमोर शरणागतीची भूमिका घेतली जात असेल, तर काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविण्याचा विचार करेल, असे संकेतही त्यांनी दिले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!