spot_img
spot_img
spot_img

कंटेनर चालकाला बेदम मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

वाहन घासल्याच्या किरकोळ कारणावरून कंटेनर चालकाला रस्त्यात अडवून त्याची गाडी फोडत बेदम मारहाण केल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावरील भंडारा हॉटेलसमोर घडली. या प्रकरणी दक्षिण चाकण पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदसिंग भारतसिंग ठाकुर (वय २१, रा. उत्तर प्रदेश) हे कंटेनर चालवत असताना आरोपींनी त्यांची गाडी थांबवली. यावेळी एका आरोपीने कंटेनरची काच फोडली, तर दुसऱ्याने गाडीत घुसून चालकाच्या छातीवर दगडाने वार केला. त्यानंतर चालकाला खाली ओढून चौघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करत शिवीगाळ केली.

या प्रकरणी शब्बीर सय्यद, गणेश खंदारे, लखन आयगुडे आणि कार्तिक पवार यांच्याविरोधात दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाबड करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!