spot_img
spot_img
spot_img

चिंबळी फाट्यावर भीषण अपघात; आयशरच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

नाशिक-पुणे महामार्गावर चिंबळी फाटा परिसरात भरधाव आयशर वाहनामुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्केश प्रल्हाद काळपांडे आणि त्याचा मित्र रुपेश दिगंबर भरक्षे हे दोघे पल्सर दुचाकीवरून मोशीकडे जात होते. चिंबळी फाटा येथे मोई गावाकडे जाणाऱ्या वळणाजवळ पुढे असलेल्या आयशर चालकाने अचानक वेग कमी करत वाहन डाव्या बाजूस घेतल्याने मागून येणारी दुचाकी जोरात धडकली.

या भीषण धडकेत दोन्ही तरुणांच्या डोक्याला, छातीला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आयशर चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालक फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!