spot_img
spot_img
spot_img

भोसरी एमआयडीसीत तब्बल ९.४५ लाखांचा माल अपहार!

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

भोसरी एमआयडीसीतील एका औद्योगिक कंपनीत लाखोंच्या माल अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीतीलच कर्मचाऱ्यांनी संगनमत करून तयार मालाची परस्पर विक्री करत तब्बल ९ लाख ४५ हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन पॉलिमर्स कंपनीचे संचालक अशोककुमार जैन यांनी फिर्याद दिली आहे. दि. १ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत कंपनीत कार्यरत असलेले आरोपी मिलींद कुलकर्णी आणि भगवान लिंगायत यांनी संगनमत करून कंपनीतील तयार माल बाहेर काढला.

हा माल त्यांच्या परिचित गुरुप्रसाद पाटील याच्या मदतीने विक्री करण्यात आला. विक्रीतून मिळालेली तब्बल ९ लाख ४५ हजार २४९ रुपयांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरत कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत. पुढील तपास पोउपनि तळेकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!