spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत पोलिसांची कारवाई; धारदार सत्तूरसह तरुण जेरबंद

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड शहरात लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत धारदार सत्तूर जवळ बाळगणाऱ्या तरुणाला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी कोणत्यातरी गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ही कारवाई केली.

ही कारवाई दि. २१ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास हिंदुस्तान अँटीबायोटीक कंपनीच्या मोकळ्या मैदान परिसरात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहसीन समीर सय्यद (वय २५, रा. खराळवाडी, पिंपरी) हा संशयास्पदरीत्या परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संत तुकारामनगर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान आरोपीकडे धारदार लोखंडी सत्तूर आढळून आला. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून दि. १३ मे ते २६ मे २०२६ या कालावधीत घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही आरोपीने हा आदेश धाब्यावर बसवत शस्त्र जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी कोणत्यातरी दखलपात्र गुन्ह्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी थांबला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस शिपाई अक्षय साळुंखे यांनी फिर्याद दिली असून श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बोकड पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!