spot_img
spot_img
spot_img

उन्हाळी शारीरिक तंदुरुस्ती व कौशल्य विकास शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज , प्रतिनिधी :  दिघी परिसरातील युवक व बालकांमध्ये व्यायाम, शिस्त आणि क्रीडाप्रेमाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने कार्यक्षम नगरसेवक मा. श्री. उदय दत्तात्रय गायकवाड आणि  जगन्नाथ लकडे साहेब (क्रीडा जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा) यांच्या संकल्पनेतून दिनांक ५ मे ते १५ मे दरम्यान उन्हाळी शारीरिक तंदुरुस्ती व कौशल्य विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला पालक व खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उल्लेखनीय उपस्थिती दर्शवली. आपल्या मुलांमध्ये व्यायामाची सवय, शिस्त आणि क्रीडांगणाची ओढ निर्माण व्हावी या सकारात्मक भावनेतून पालकांनी मुलांना मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी करून घेतले, ही निश्चितच कौतुकास्पद बाब ठरली.

गेल्या अकरा दिवसांत हे शिबिर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात, शिस्तबद्ध नियोजनातून आणि सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले. विशेष म्हणजे हे संपूर्ण शिबिर अनिल घुले सर यांच्या देखरेखीखाली व मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरीत्या पार पडले. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रशिक्षकांनी सहभागी खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्ती, कौशल्य विकास आणि संघभावना यांचे मोलाचे प्रशिक्षण दिले.

या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून  मोहन झुंजे पाटील सर,   गणेश झगडे सर,   विनोद वाळके सर,   प्रमोद भोसले सर,   अमित गमरे सर,   राम रजक सर,   संजय सूर्यवंशी सर,   प्रल्हाद ठाकूर सर आणि   अक्षय तापकीर सर यांनी विशेष मेहनत घेतली.

नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यातही अशाच प्रकारचे शिबिर, स्पर्धा व विविध क्रीडा उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात येणार असून, नव्या पिढीला सक्षम, सुदृढ आणि क्रीडामय बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन योगदान द्यावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे सर्व पालक, खेळाडू, प्रशिक्षक व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!