spot_img
spot_img
spot_img

खंडणी न दिल्याने फर्निचर मॉलवर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने पुनावळेत दहशत

 

पिंपरी चिंचवड, (प्रतिनिधी : युनूस खतीब) पुनावळे परिसरात खंडणीसाठी थरारक गोळीबाराची घटना घडली असून, ए.जे. फर्निचर मॉलवर अज्ञात दुचाकीस्वारांनी ५ ते ६ राऊंड फायरिंग करत व्यावसायिकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी रावेत पोलिसांनी भारतीय न्याय संहितेसह हत्यार कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगदीश बिष्णोई यांच्या भागीदार अशोक कुमार बिष्णोई यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल करत २ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. मात्र, कोणताही प्रतिसाद न दिल्याने गुरुवारी रात्री पुनावळे येथील ए.जे. फर्निचर मॉलसमोर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी पिस्टलमधून थेट फायरिंग केले.

या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर येत असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!