शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुण्यातील ससाणेनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी Pune City Police यांच्या काळेपडळ पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत मुख्य आरोपींसह ६ जणांना अटक केली आहे.
३ मे २०२६ रोजी ससाणेनगर येथील हिंगणे बिल्डिंग पार्किंगमध्ये गणेश बिरादार (वय २५) यांच्यावर सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांची हत्या केली.
तपासादरम्यान मुख्य आरोपी दुर्वांग उर्फ पारस मानकर हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. पोलिसांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपी साहील शेलार, चंद्रशेखर जावीर, सूरज दोरकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मुख्य आरोपी दुर्वांग मानकर, पारस गायकवाड आणि अभिजीत इंगळे यांनाही खेडशिवापूर-कात्रज परिसरातून अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अजय हंचाटे करत असून, पोलीस उपायुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


