spot_img
spot_img
spot_img

छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्‍या जयंती निमित्त पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘रणझुंजार, बहुआयामी आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचा आज जन्मोत्सव. औरंगजेबाच्या अमानुष छळासमोर न झुकता, स्वराज्यासाठी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढणाऱ्या या राजाचा इतिहास आजच्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत आहे.
इतिहासातील चुकीचे दाखले पुसून शंभूराजेंचे सत्य आणि दैदीप्यमान चरित्र घराघरात पोहोचवणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. शिवरायांचा वारसा आणि शंभूराजेंचे बलिदान हेच महाराष्ट्राच्या अस्मितेचे खरे आधारस्तंभ आहेत.’’

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत माजी नगरसेवक अजित दरेकर, उपाध्यक्षा प्राची दुधाणे, सरचिटणीस सीमा सावंत, प्रियंका मधाळे, ऋग्वेदिता सपकाळ, संदिप मोकाटे, सुरेश नांगरे, फिरोज शेख, हरिदास अडसूळ, मुन्ना खंडेलवाल आदी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!