शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात महिला, युवती, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी शासकीय शहरी योजनांविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित राहून विविध शासकीय शहरी योजनांची सविस्तर माहिती प्रेझेंटेशनच्या माध्यमातून महिला व युवतींना दिली. विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी हे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रभागांमध्ये काम करताना निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या उपक्रमाचे आयोजन पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, शुभाष जगताप, पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अॅड. निलेश निकम, नगरसेवक राकेश कामठे, शिवाजीनगर अध्यक्ष अभिषेक बोके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन युवती कार्याध्यक्ष अमृता रानवडे आणि युवती उपाध्यक्ष ऐश्वर्या राठोड (चोपडे) यांनी केले.
कार्यक्रमाला महिला पदाधिकारी, युवती, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


