spot_img
spot_img
spot_img

नवोन्मेष व तांत्रिक कौशल्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची – डॉ. राजेंद्र हिरेमठ

शबनम न्यूज | प्रतिनिधी

युवकांमध्ये नवोन्मेष, तांत्रिक कौशल्य, स्टार्टअप, वित्तीय नियोजन व उद्योजकता विकसित करण्यासाठी टेक्नोव्हेट सारख्या तांत्रिक स्पर्धांची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी ग्रामीण विकास, उद्योजकता आणि संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा असे मार्गदर्शन करिअर समुपदेशक व सिनर्जी व्हॅल्युअर्स अँड प्रोजेक्ट कन्सल्टंट प्रा. लि. चे संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये वार्षिक तांत्रिक महोत्सव अंतर्गत “टेक्नोव्हेट २०२६” या तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये महाराष्ट्रासह देशभरातून सुमारे ३०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघांना व विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांची बक्षीसे आणि प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी पीसीसीओइआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, सावी इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक डॉ. विकास पाटील, पीसीसीओइआरचे संशोधन विभाग प्रमुख डॉ. सुदर्शन बोबडे आदी उपस्थित होते
डॉ. विकास पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्य स्थितीतील तांत्रिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक कौशल्य, उद्योग क्षेत्रातील गरजा आणि करिअरच्या संधी याबाबत नेहमी जागरूक राहणे गरजेचे आहे.
प्रास्ताविक करताना संस्थेचे संचालक, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांद्वारे स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. महाविद्यालयातील तांत्रिक वातावरण, संशोधन संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध आहे.
डॉ. सुदर्शन बोबडे म्हणाले की, नवोन्मेष आणि पेटंट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी. तसेच प्रकल्प सादरीकरण, स्टार्ट अप्स आणि इंडस्ट्री ओरिएंटेड शिक्षण याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
आयोजनात डॉ. दिपाली ढाके, प्रा. अक्षय राहणे, विद्यार्थी समन्वयक कुशल बोरसे व श्रेया रेवडे यांनी सहभाग घेतला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
स्वागत डॉ. सुदर्शन बोबडे, आभार अक्षय राहणे यांनी मानले.
स्पर्धेतील प्रथम विजेते पुढीलप्रमाणे :-
थ्री डी प्रिंटिंग डिझाइन स्पर्धेत प्रथम क्रमांक – अनुप कुलकर्णी आणि टीम करण मेंदाद, पीसीसीओइआर;
स्ट्रक्ट्रोमॅनिया स्पर्धेत प्रथम क्रमांक – हर्ष कुंभार आणि टीम पीसीसीओइआर, रावेत;
बीजीएमआय स्पर्धेत प्रथम क्रमांक – प्रशांत शर्मा एस. बी. पाटील कॉलेज प्रथम वर्ष कॉमर्स, रावेत;
आयपीएल ऑक्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक – सीएसके – साई गोळेकर आणि टीम;
प्रॉम्प्ट बॅटल स्पर्धेत प्रथम क्रमांक – टीम ब्रेन हॅकर्स पीसीसीओइआर चे विनय वानखेडे आणि चेतन यादव, प्रणव तुसे, संकल्प तुसे;
शार्क टँक स्पर्धेत प्रथम क्रमांक – टीम महावायू इनोवेशन, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, आकुर्डीचे सृष्टी काकड आणि अथर्व दरपुडे, आर्यन सुर्वे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!