शबनम न्यूज | प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त सात वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जीवन विद्या परिवर्तन ट्रस्ट पुणे संचलित स्नेहछाया परिवाराचा ७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
दिघी येथील संत गजानन महाराज सांस्कृतिक भवन (मॅक्झिन चौक) येथे पार पडलेल्या या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच स्नेहछाया परिवारातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व वृक्षपूजनाने झाली. स्नेहछाया परिवारातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने आणि योगासनांच्या सुंदर प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब जाधव तसेच सेवानिवृत्त उपायुक्त (अन्न व औषध प्रशासन, पुणे) श्री श्यामसुंदर प्रतापवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनपर विचारांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना शिक्षण, संस्कार व सामाजिक बांधिलकीची नवी दिशा दिली.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका व महिला व बालकल्याण सभापती सौ. राणी (माई) अशोक पठारे, नगरसेवक उदय भाऊ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ गायकवाड, कुलदीप भाऊ परांडे, रवी चव्हाण, सुनील काकडे, कैलास बोरसे, के. के. जगताप, विश्वास पौळ, मयूर फापाळे, संतोष केकाण, शिवाजी शिंदे उपस्थित होते.
तसेच शिक्षक मित्र परिवारातील सुनिता भोसले, हनुमंत आगे, प्रा. मुबीन तांबोळी, अंगद शिंदे, मिना आखाडे, प्रमोद लाड, प्रा. इंद्रजीत भोसले, संजय लंघे, सुप्रिया लंघे, हरीश जगताप, पांडुरंग म्हेत्रे, प्रा. पंडित सर, प्रा. निवळीकर सर यांची ही उपस्थिती लाभली.
सामाजिक क्षेत्रातील- रामेश्वर बोंगाळे, दर्शन दुग्गड, किशोर गुज्जर, सुनील चोरडिया, सुरेश कोते, रवींद्र शिरसाळकर, सचिन शिंदे, प्रवीण पुणेकर, संदीप सोनवणे, कोंडीबा भोर, संजय संजय बिरदवडे, मयूर शिंदे, उद्योजक – कैलास बोरसे, मनसुख नवले,अतुल नवले,आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार बंधूंमध्ये योगेश गाडगे, संतोष गोतावळे, माऊली भोसले, महावीर जाधव, सिद्धांत चौधरी, भीमराव बरगडे व अन्य पत्रकारांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमासाठी सौजन्य देणारे क्रिकेट टायर्स अँड ऑटो सर्विसचे वैभवशेठ काळजे तसेच अनंत मिल्क प्रायव्हेट लिमिटेडचे नितीन थोपटे यांचीही उपस्थिती होती.
सामाजिक बांधिलकी जपत वंचित, उपेक्षित तसेच आदिवासी व दुर्बल घटकांतील लेकरांसाठी कार्य करणाऱ्या स्नेहछाया परिवाराच्या कार्याचा गौरव म्हणून प्रा. दत्तात्रय इंगळे व सौ. माई इंगळे यांचा विविध संस्थांच्या प्रतिनिधी व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्नेहछाया परिवारातील सल्लागार मनोहर कोलते, योगगुरु विजय दाते व अजिंक्य शिंदे,विक्रम साखरे, शंकर गाडे, अमित झोंबाडे, दगडू राम शिकारे, सुनील इंगळे, अपूर्वा झोंबाडे, सुरेंद्र आवाड, प्रसाद पुजारी, नानासाहेब इंगळे, निखिल टेकवडे, पराग शिळीमकर, आदेश दाभाडे, संस्कृती इंगळे, उदय हाडवळे तसेच सर्व कार्यकर्ते, स्वयंसेवक व हितचिंतक यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दत्तात्रय इंगळे यांनी केले, सूत्रसंचालन सौ. अलका जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन सारिका माई इंगळे यांनी व्यक्त केले.
हा सोहळा केवळ वर्धापन दिनापुरता मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प दृढ करणारा ठरला.



