spot_img
spot_img
spot_img

समाजाच्या उन्नतीसाठी संघटनेची नेतृत्व उभी करण्याची गरज ; राष्ट्रीय अध्यक्ष चरण सिंग टाक

शबनम न्यूज | पुणे प्रतिनिधी शंकर जोग

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेची बैठक पुणे येथे शासकीय विश्रामगृह सर्किट हाऊसमध्ये घेण्यात आली. यावेळी मेहतर वाल्मिकी समाजातील विविध कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेची सुरुवात सरदार बुटासिंग, वसंतराव चव्हाण, वासुदेव चांगरे, आणि विविध राज्यातील समाजातील नेत्यांनी खूप परिश्रमाने उभी केली. संघटनेला न्याय देण्याचे असेल तर नेतृत्वाला बळ देण्याची गरज आहे.

समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक, व राजकारणात आरक्षणाच्या वर्गीकरणात वाटा देण्यात यावा यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे व संघटनेमध्ये एक नेता निवडा त्यांच्या नेतृत्वात लढण्यासाठी उभे रहा असे मत टाक यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ अनुपम बेगी,सतीश लालबिगे, कविराज संघेलीया, दिपक चव्हाण, दीपक निनारिया, विनोद निनारीया, महेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर माने, परविन लालबिगे,रेखा राजे, संजय बेगी, विक्रांत विशिष्ट, सूर्यकांत यादव, रवी बेंगळे, तेजस्विनी सडेकर, धर्मेंद्र सडेकर आदि उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने नसरापूर येथे चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!