spot_img
spot_img
spot_img

शिरूरमध्ये ड्रग्ज रॅकेटवर धाड; ४७.६० ग्रॅम एमडीसह तिघे जेरबंद

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर परिसरात मोठी कारवाई करत एमडी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आणि सेवन करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून ४७.६० ग्रॅम एमडी ड्रग्ज, दोन चारचाकी वाहने असा तब्बल २१ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशामुक्त भारत अभियानांतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांकडून अंमली पदार्थविरोधी विशेष मोहीम सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शिरूर येथील न्हावरा फाटा ते बाबुरावनगर रोडवरील शिवसाईलिला मंगल कार्यालयासमोर उभ्या असलेल्या दोन कारमधील व्यक्तींकडे एमडी ड्रग्ज असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. कारवाईदरम्यान विशाल मारुती मोरे (वय २०), प्रतीक संतोष लंघे (वय २५) आणि मिथुन विजयपाल सिंग (वय २६) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. झडतीत त्यांच्याकडून ४७.६० ग्रॅम एमडी अंमली पदार्थ, दोन चारचाकी वाहने असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासात आरोपींना ड्रग्ज पुरवठा करण्यासाठी ‘पोर्टर’ डिलिव्हरी अॅपचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माध्यमातून ड्रग्ज मागवणाऱ्या व्यक्तींचाही शोध सुरू असून काहींचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. युवकांमध्ये वाढता ड्रग्जचा विळखा रोखण्यासाठी अशा कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!