spot_img
spot_img
spot_img

विटभट्टीवर कौटुंबिक वादातून खून

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

मावळ तालुक्यातील परंदवडी येथील विटभट्टीवर कौटुंबिक वादातून एका मजुराचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मनोहर भोते यांच्या विटभट्टीवरील खोलीसमोर फिर्यादी सुनिता मुकणे व तिचे पती लक्ष्मण उर्फ दगडू मुकणे यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू होता. त्यावेळी वाद मिटवण्यासाठी आलेल्या संतोष रघु वाघमारे (वय ४०) याने लक्ष्मण मुकणे याच्या डाव्या कानाजवळ लाकडी दांडक्याने मारहाण केली.

या मारहाणीत लक्ष्मण मुकणे गंभीर जखमी झाला असून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी संतोष वाघमारे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!