spot_img
spot_img
spot_img

ताथवड्यात डिलिव्हरी बॉयकडून गावठी पिस्तूल जप्त

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

ताथवडे परिसरात बेकायदा गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी दुपारी जे.एस.पी.एम. कॉलेजच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात आरोपी महेश गंगाधर साळवे (वय २६) याच्याकडे एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलावर कोणतेही ओळखचिन्ह अथवा क्रमांक नव्हता.

शहरात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करून आरोपीने शस्त्र बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी हा अॅमेझॉन डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!