spot_img
spot_img
spot_img

चिखलीत अनधिकृत बांधकामांवर मनपाची कडक कारवाई; विकासकांवर गुन्हे दाखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चिखली प्रभाग क्रमांक १ मधील देवभूमी हौसिंग सोसायटी, चिंचेचा मळा आणि अष्टविनायक चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकूण चार ठिकाणी झालेल्या या बेकायदेशीर बांधकामांविरोधात मनपा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित बांधकामधारक व विकासकांना २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नोटिसा बजावून स्वतःहून बांधकाम काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत १८ मार्च २०२६ रोजी सुमारे ६०० चौ.मी. क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

कारवाईनंतरही संबंधितांकडून पुन्हा बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे १६ एप्रिल २०२६ रोजी मनपाने पुन्हा धडक कारवाई केली. यावेळी संबंधित बांधकामधारक, विकासक व व्यावसायिकांकडून तीव्र विरोध झाला. तरीही प्रशासनाने कारवाई सुरू ठेवत कायद्याची अंमलबजावणी केली.

मा. अतुल पाटील, क्षेत्रीय अधिकारी तथा उपायुक्त (अतिक्रमण विभाग) यांच्या आदेशानुसार संबंधित चार अनधिकृत बांधकामधारक व विकासकांविरोधात एमआरटीपी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मनपा प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, शहरातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!