spot_img
spot_img
spot_img

चिखलीत किरकोळ धडकेतून राडा; इनोव्हा चालकासह दोघांवर हल्ला, एक गंभीर जखमी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

चिखली परिसरात वाहनाच्या किरकोळ धडकेतून वाद निर्माण होऊन तिघांनी मिळून कारमधील तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे.

ही घटना सोमवारी (दि. २१ एप्रिल) दुपारी साडेएकच्या सुमारास पूर्णानगर येथील भोसले पंपासमोरील यू-टर्नवर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धांत यादव यांच्या इनोव्हा क्रिस्टा कारला काळ्या रंगाच्या स्प्लेंडर दुचाकीची धडक बसली. यानंतर दुचाकी चालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी संतापून शिवीगाळ करत धमक्या दिल्या. त्यानंतर हाताने, धातूच्या कड्याने, दगडाने तसेच काचेच्या ग्लासने कारमधील तरुणांना बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात ऋषिकेश वहीले हा गंभीर जखमी झाला असून ध्रुव सोनी हा किरकोळ जखमी झाला आहे. आरोपींनी फिर्यादीच्या कारचेही नुकसान केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात दोन विधीसंघर्षित बालकांसह सौद सामानी अब्दुल मतीन (वय २०, रा. मोरवाडी गावठाण, पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!