spot_img
spot_img
spot_img

दिघीत अश्लील कृत्यांवर पोलिसांची कारवाई; दोन महिला ताब्यात

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

दिघी परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करत नागरिकांना त्रास देणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दिघी-आळंदी रोडवरील आराधना हॉटेलसमोर ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस शिपाई योगेश शेळके यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घटनास्थळी दोन महिलांनी फिर्यादी व इतर नागरिकांकडे अश्लील हावभाव करत, अश्लील शब्दांचा वापर केला. तसेच त्यांनी फिर्यादीच्या अंगावर हात फिरवत, जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होईल असे वर्तन केल्याचे समोर आले आहे. या कृत्यामुळे सार्वजनिक सभ्यतेचा भंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक (पिटा) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित दोन महिलांना ताब्यात घेऊन बीएनएसएस कलम ३५ (३) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!