spot_img
spot_img
spot_img

डिंपल ,अंजली ,नंदिनी यांची राज्यस्तर कबड्डी स्पर्धेसाठी निवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांची मान्यतेने दिनांक १४ते१८ जुलै २०२५दरम्यान शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणाऱ्या१८ वर्षाखालील राज्यस्तर निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहर संघासाठी पिंपरी चिंचवड मनपा क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाच्या कु. डिंपल उडानशिवे, अंजली पौळ व नंदिनी साधू यांची निवड झाली असून त्यांचे श्री पंकज पाटील साहेब उपायुक्त क्रीडा पिं.चिं‌.म.नपा, श्री किशोर ननवरे प्रभाग अधिकारी प्रभाग, श्रीरंगराव कारंडे क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड म.न.पा, श्री ग्यानचंद भाट प्रशासन अधिकारी क्रीडा विशेष अभिनंदन करून पुढील स्पर्धेत शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धेतून उत्तर प्रदेश हरिद्वार येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेचा प्राथमिक संघ निवडला जाणार आहे.
सदर खेळाडूंना श्री बन्सी आटवे क्रीडा पर्यवेक्षक व श्रीमती सोनाली जाधव यांचे मार्गदर्शन तर श्री रोनित आव्हाड यांचे सहकार्य लाभले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!