spot_img
spot_img
spot_img

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ४ जून पासून फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

मुंबई, – सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन 4 जून पासून ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ ही भव्य ऐतिहासिक मालिका घेऊन येताना गर्व अनुभवत आहे. एक निर्भीड प्रजा-रक्षक राजा पृथ्वीराज चौहान आणि भयंकर आक्रमणकर्ता मोहम्मद घोरी यांच्यातील युद्धाची ही कहाणी आहे.
12 व्या शतकातील ही गोष्ट म्हणजे केवळ युद्धाची गोष्ट नाही. विवेक आणि विजयाची ही गोष्ट आहे. घोरी सत्तेच्या लालसेने भारत जिंकण्यासाठी आला होता. पण त्याच्या मार्गात आडवा आला, तो एक तरुण आणि शूर वीर राजा, ज्याची रणनीती ही त्याची सगळ्यात मोठी ताकद होती. या भव्य मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे राजमातेची भूमिका करत आहे, जी पृथ्वीराजची आजी आहे. तिच्या अभिनयामुळे मालिकेला एक भावनिक गहिरेपण आले आहे.
पद्मिनी कोल्हापुरे म्हणते, “मी जेव्हा जेव्हा पृथ्वीराज चौहान हे नाव ऐकते तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून येतो. तो फक्त एक योद्धा नव्हता, तर तो आजही शौर्याचे प्रतीक मानला जातो. आपण अनेक युद्धे पाहिली आहेत. पण पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यात झालेले युद्ध हे अशा युद्धांपैकी एक आहे, जे आपल्या स्मृतीत कोरले गेले आहे. कोवळ्या वयात राजा झालेल्या पृथ्वीराजने अत्यंत ताकदीने लढा दिला. आपल्या देशाच्या रक्षणाची त्याने प्रतिज्ञा केली होती आणि आपल्या जीवनातून त्याने हे दाखवून दिले की, तुमच्याकडे ताकद आली, की त्यासोबत मोठी जबाबदारी देखील येते.”
ही महान कथा उलगडताना बघा 4 जून पासून दर सोम ते शुक्र रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!