थेरगाव : माजी नगरसेवक कैलास बाबा बारणे युथ फाउंडेशनच्या वतीने साईनाथ नगर, थेरगाव येथे थेरगाव परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देऊन त्यांच्यासोबत आनंदाची दिवाळी साजरी करण्यात आली.
या उपक्रमाला माजी नगरसेवक कैलास बाबा बारणे, नगरसेविका योगिताताई महेश बारणे, साईनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रवीण नाना बारणे, अक्षय दादा बारणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्यासोबत मिठाई आणि दिवाळी फराळाचा आस्वाद घेत आनंदाचे क्षण साजरे करण्यात आले.
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सफाई कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या या अमूल्य योगदानाची जाणीव ठेवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे, त्यांच्या कष्टांचा सन्मान करणे आणि सणाच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घेणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.




Total Users : 238355