spot_img
spot_img
spot_img

वाढदिवसानिमित्त नगरसेविका शालिनीताई गुजर यांच्याकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

प्रभाग क्रमांक २४ मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव

सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला वाढदिवस !

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या सौ. शालिनीताई कांतीलाल गुजर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविला. प्रभाग क्रमांक २४ मधील महानगरपालिकेच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

शहर आणि प्रभाग स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असतात. ऊन, पाऊस असो किंवा सण-उत्सव, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत हे कर्मचारी आपले कर्तव्य अत्यंत निष्ठेने पार पाडत असतात. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाची जाणीव ठेवत शालिनीताईंनी स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी प्रभाग क्रमांक २४ मधील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांच्या मेहनतीचा, सेवाभावाचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

“स्वच्छतेसाठी झटणाऱ्या हातांचा सन्मान, हीच खऱ्या अर्थाने आनंदाची दिवाळी!” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला. वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता समाजासाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करून साजरा करण्याच्या शालिनीताईंच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!