spot_img
spot_img
spot_img

बोपखेलमधील उद्यानाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करा; युवासेनेच्या प्रतीक्षा घुले यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 बोपखेल येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या प्रशस्त उद्यानाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. चार ते पाच वर्षांपासून काम सुरू असल्याचे सांगितले जात असतानाही उद्यान अद्याप नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

बोपखेल परिसरातील नागरिकांना विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने उद्यानाची उभारणी करण्यात येत आहे. मात्र, काम पूर्ण होण्यास होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येत नाही. उद्यानाचे काम कधी पूर्ण होणार आणि त्याचे लोकार्पण कधी होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

याबाबत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा केली असता, संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसून उडवाउडवीची उत्तरे देऊन विषय टाळला जात असल्याचा आरोप युवासेनेच्या प्रतीक्षा घुले यांनी केला आहे. चार ते पाच वर्षांपासून काम सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात. उद्यानाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून त्याचे लोकार्पण करावे आणि हे उद्यान नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी युवासेनेच्या प्रतीक्षा घुले यांनी केली आहे. यावेळी दक्षता समितीचे सदस्य रवि कोवे उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!