spot_img
spot_img
spot_img

केवळ पदे घेऊ नका, पदाला न्याय द्या – उदय सामंत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकऱ्यांनी संघटना वाढीवर लक्ष केंद्रित करावे. संघटना मजबूत, बळकट करावी. अनेक जण केवळ पदे घेऊन आणि कार्ड छापून त्याचा दुरुपयोग करतात. ते खपवून घेतले जाणार नाही. घेतलेल्या पदाला न्याय देत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या सूचना उद्योगमंत्री, शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख उदय सामंत यांनी पिंपरी-चिंचवड येथील शिवसेना पदाधिकारी आढावा बैठकीत दिल्या.

पिंपरी-चिंचवड शिवसेनेची आढावा बैठक नुकतीच थेरगाव येथे पार पडली. या वेळी ते बोलत होते. विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, शिवसेनेचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे, महापालिकेतील गटनेते विश्वजित बारणे, महिला उपनेत्या, नगरसेविका सुलभा उबाळे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, जिल्हा संघटक बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख, नगरसेवक निलेश तरस, जिल्हा संघटिका शीला भोंडवे, शहर संघटिका सरिता साने, महानगरप्रमुख राजेश फलके, युवासेना प्रमुख सागर पाचारणे ,मावळ तालुका प्रमुख रामभाऊ सावंत ,युवतीसेना जिल्हाप्रमुख सायली साळवी ,युवासेना शहरप्रमुख चेतन बेंद्रे ,चिंचवड विधानसभा प्रमुख बापू काटले ,भोसरी विधानसभा प्रमुख गणेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. संघटनात्मक बांधणी, पदाधिकऱ्यांच्या आतापर्यंतच्या कामांचा आढावा घेण्यात आला. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संघटना बांधणी मजबूत करणे, शाखाप्रमुख ते शहरप्रमुख यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे आणि पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्यांना योग्य प्रकारे समाविष्ट करून घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मतदारयाद्यांचे पुनर्रघटन सुरू असताना कोणताही मतदार वगळला जाणार नाही याकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, मराठवाड्यातील दुष्काळामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

उदय सामंत म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात प्रबळपणे काम करीत आहे. जनतेसाठी सरकार अत्यंत चांगले निर्णय घेत आहे. हे निर्णय सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावेत. पुणे जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघ असून पुनर्रचनेत २९, ३० होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही मतदारसंघ वाढणार आहेत. त्यादृष्टीने उमेदवार डोळ्यासमोर ठेऊन काम करावे. वाढलेल्या जागेवर शिवसेनेचे आमदार असले पाहिजेत. लोकसभेचेही मतदारसंघ वाढतील. त्यामुळे भविष्यातील राजकारणात पुणे जिल्ह्यात शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणाचेही भले होणार नाही, अशी ताकद निर्माण करावी. यंदा राज्यात दुष्काळ आहे. शिवसैनिकांनी फिरायला जाण्यापेक्षा मराठवाड्यात जावे. तेथील लोकांना मदत करावी. मराठवाड्यातून पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था शिवसेनेतर्फे केली जाणार आहे. शिवसेनेपेक्षा कोणत्याही पक्षाने दुष्काळग्रस्तांना मदत केली नाही.

पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढीस मोठा वाव – सचिन अहिर सचिन अहिर म्हणाले की, “मला आणि उदय सामंत यांना पुणे जिल्ह्याचा चांगला अनुभव आहे. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहता या भागामध्ये शिवसेना अधिक चांगली वाढू शकते. कोण पुढे गेला यापेक्षा आपण संघटनेचे काम प्रामाणिकपणे करत राहिलो, तर आपली स्थिती नक्कीच मजबूत राहील. कार्यकर्त्यांना बळ देण्याची जबाबदारी आमची दोघांची आहे.

वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला परताव्याचा प्रश्न शिंदे यांच्यामुळे मार्गी

शिवसेनेकडे सर्व कार्यकर्त्यांचा ओढा आहे. विविध पक्षातील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करतात. नेत्यांनी कार्यकर्त्यांला बळ दिले पाहिजे. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आपण सत्तेत असलो, तरी पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना सातत्याने रस्त्यावर उतरली. यापुढेही उतरेल. निगडीतील रस्ते अरुंद करणाऱ्या हरित सेतूच्या प्रकल्पाविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली. मोशीच्या दुर्घटनेला शिवसेनेने वाचा फोडली. अधिकाऱ्यांना निलंबित करेपर्यंत शिवसेना लढली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पिंपरी-चिंचवडमधील प्राधिकरणाचा साडेबारा टक्के परताव्याचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावल्याचेही त्यांनी सांगितले. सुलभा उबाळे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरप्रमुख निलेश तरस यांनी केले, सागर पाचारणे यांनी आभार मानले.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!