spot_img
spot_img
spot_img

गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल गीतांनी निगडीत रंगणार ‘दिवाळी पहाट’

– अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचा संगीतप्रेमींसाठी विशेष सांगीतिक सोहळा
– भावगीत, चित्रपटगीतांसह भक्तिगीतांची प्रेक्षकांना मिळणार मेजवानी

पिंपरी, : दिवाळीच्या मंगलमय पहाटेला सुरेल संगीताची जोड देण्यासाठी निगडी प्राधिकरणात ‘दिवाळी पहाट २०२६’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता सेक्टर २७ अ येथील नियोजित महापौर निवास मैदानावर हा कार्यक्रम रंगणार आहे. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांची विशेष उपस्थिती आणि त्यांची लोकप्रिय गीते हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

या संगीत सोहळ्यात हिंदी व मराठी चित्रपटांतील लोकप्रिय गीतांसह भक्तिगीतांचीही सुरेल मेजवानी निगडीकर रसिकांना अनुभवता येणार आहे. अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजातील ‘माई नी माई’, ‘दिल है कि मानता नहीं’ आणि ‘तू मेरा जानू है’ यांसारख्या गाजलेल्या गीतांची रंगत रसिकांना अनुभवता येणार आहे.माजी उपमहापौर, नगरसेविका सौ. शैलजा अविनाश मोरे , मा.प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र अनुप शैलजा अविनाश मोरे आणि अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन उपाध्यक्ष समीर शैलजा अविनाश मोरे व अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीच्या पहाटे संगीताचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!