युवा नेते मयूर काळभोर यांचा सामाजिक उपक्रम; थंडीपासून संरक्षणासाठी मदतीचा हात
शबनम न्यूज | प्रतिनिधी
विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते मयूर काळभोर यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यालयात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना थंडीपासून संरक्षण मिळावे, यासाठी स्वेटरचे वाटप करण्यात आले.
वाढदिवस केवळ शुभेच्छा, सत्कार आणि जल्लोषापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. थंडीच्या दिवसांत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी आमदार अमित गोरखे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखी जीवन लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि त्यांची काळजी घेणे ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे, या भावनेतून मयूर काळभोर यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.




Total Users : 236591