spot_img
spot_img
spot_img

संकट काळात शासन बळीराजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दुष्काळाच्या संकटामध्ये राज्य शासन बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. दिवाळीपूर्वी तातडीने पाच हजार रुपयांची मदत केली जात असून ही मदत अंतिम नाही. यानंतरही शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. त्यामुळे धीर सोडू नका, काळजी करू नका. कोणत्याही परिस्थितीत टोकाचा विचार मनात आणू नका, आम्ही सरकार म्हणून तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली. तसेच या संकटकाळात शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. नांदेड जिल्ह्यातील वाडी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.    

 यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कदम-कोहळीकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार आनंद तिडके-बोंढारकर, आमदार भिमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, महापौर कविता मुळे, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर आदींसह नागरिक उपस्थित होते.

दुष्काळामुळे आज शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे, या संकट काळात संपूर्ण राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या संकटाची दाहकता ओळखून राज्य शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना विविध सवलती लागू केल्या. यापुढेही शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे, शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!