spot_img
spot_img
spot_img

सहाय्यक प्रशासन अधिकारी खान रजिया सेवानिवृत्त; ३९ वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा गौरव

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे शाल व श्रीफळ देऊन सन्मान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीमती खान रजिया यांनी ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती घेतली. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशफाक शेख आणि सहसचिव मो. आतिफ फैसल यांच्या हस्ते खान रजिया यांचा सत्कार करण्यात आला. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात ३९ वर्षे सेवा बजावताना त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवेमुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या शैक्षणिक वाटचालीत मोलाचे योगदान मिळाले, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अशफाक शेख म्हणाले, “खान मॅडम यांनी आपल्या आयुष्यातील ३९ वर्षे शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित केली. त्याग, समर्पण आणि सेवाभावातून त्यांनी समाजाची तसेच विद्यार्थ्यांची सेवा केली आहे. शिक्षण विभागातील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील.”

खान रजिया यांच्या प्रदीर्घ सेवेला अभिवादन करत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या वतीने त्यांना निरोगी, आनंदी आणि समाधानकारक सेवानिवृत्त जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या पुढील आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे, अशी सदिच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!