spot_img
spot_img
spot_img

भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अनुशासन समितीची घोषणा

पक्षांतर्गत शिस्त आणि संघटनात्मक बळकटीकरणासाठी सहा जणांचा समितीत समावेश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत करणे, पक्षाचा योग्य विस्तार साधणे आणि निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांनी अफवा व खोट्या प्रचाराला बळी न पडता पक्षाचे काम जोमाने करावे, या उद्देशाने भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अनुशासन समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून पक्षांतर्गत शिस्त व अनुशासन अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे.

पक्ष संघटना सुरळीतपणे चालण्यासाठी तसेच संघटनेचा विस्तार प्रभावीपणे होण्यासाठी पक्षांतर्गत शिस्त आणि अनुशासन महत्त्वाचे असते. भारतीय जनता पार्टीची पक्षांतर्गत शिस्त ही पक्षाची ओळख असल्याचे नमूद करत, ती अधिक मजबूत करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत कार्यकर्त्यांनी कोणत्याही खोट्या बातम्या, अफवा किंवा चुकीच्या प्रचाराला बळी न पडता पक्षाच्या संघटनात्मक कामाला प्राधान्य द्यावे, यावरही भर देण्यात आला आहे.

या समितीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ विधिज्ञ, लोकप्रतिनिधी तसेच पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम करण्याचा अनुभव असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

समितीमध्ये या सहा जणांचा समावेश

भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अनुशासन समितीमध्ये पुढील सदस्यांचा समावेश आहे.

१. सदाशिव दादासाहेब खाडे
२. आमदार उमा गिरीश खापरे
३. ॲड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे
४. ॲड. गोरखनाथ गेनबा झोळ
५. प्रशांत कृष्णराव शितोळे
६. विकास हरिश्चंद्र डोळस

पक्षांतर्गत अनुशासन कायम राखणे, संघटनात्मक कामकाज अधिक सक्षम करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये शिस्तीची भावना दृढ करणे, या उद्देशाने या समितीची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या कामकाजात अनुशासनाला अधिक महत्त्व दिले जाणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!