spot_img
spot_img
spot_img

एमआयटी एडीटी विद्यापीठात आजपासून ‘विश्ववेद संमेलन’

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय वैदिक परंपरा, ज्ञानपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या (एडीटी) वतीने ‘विश्व वेद संमेलन २०२६’चे आयोजन २९ व ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. लोणी काळभोर येथील विद्यापीठाच्या विश्वराजबाग परिसरातील उर्मिलाताई कराड सभागृहात हे दोन दिवसीय संमेलन होणार आहे.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील श्रीपीठमचे पीठाधिपती परमपूज्य श्री जगद्गुरू परिपूर्णानंद महास्वामीजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी श्री अकेल्ला दत्ता दुर्गा साई कुमार घनपाठीजी, श्री संतोष कुमार घनपाठीजी, डॉ. डी. फणी यज्ञेश्वर यजुलू घनपाठीजी आणि श्री विवेक शास्त्री गोदबोले घनपाठीजी यांच्यासह वेदविद्येतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी वेदमूर्ती श्री दीपांशू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच वेदमूर्ती श्री विश्वास देवकरजी, श्री शरद जोशी महाराज, श्री गिरिजा प्रसाद षडंगीजी, श्री अकेल्ला दत्ता दुर्गा साई कुमार घनपाठीजी आणि श्री मंगेश बावीकर घनपाठीजी यांची उपस्थिती लाभणार आहे.

एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक आणि एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कुलपती व अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन आयोजित करण्यात येत आहे. विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोव्होस्ट डॉ. सायली गणकर, डॉ. अनुपमा रयली आणि डॉ. माधवी गोडबोले यांच्या पुढाकारातून हे संमेलन आयोजित करण्यात येत आहे.
भारतीय ज्ञानपरंपरेतील वेदांचे महत्त्व, त्यातील विचारधारा आणि आधुनिक काळातील त्यांची उपयुक्तता यांविषयी संवाद साधण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत तिचे संक्रमण करण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांना विशेष महत्त्व आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!