spot_img
spot_img
spot_img

लोकमान्य होमिओपॅथी मेडिकल महाविद्यालयाच्या ‘रंगभारत युवागंधार’ स्नेहसंमेलनात विशाल काळभोर यांचा विशेष सन्मान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

लोकमान्य होमिओपॅथी मेडिकल महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘रंगभारत युवागंधार’ या वार्षिक स्नेहसंमेलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश माजी सरचिटणीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी विधानसभा माजी अध्यक्ष विशाल बाळासाहेब काळभोर यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या स्नेहसंमेलनादरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य आणि गायनाच्या कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे वातावरण आनंदमय झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याची भावना विशाल काळभोर यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे डायरेक्टर निहाल पानसरे यांच्या हस्ते विशाल काळभोर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी लोकमान्य हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. चारुदत्त आपटे, डॉ. झोया पानसरे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली मोहरील, डॉ. शाम अहिरराव, डॉ. समीर बोडस, विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत नेवाले यांच्यासह महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक, प्राध्यापक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!