spot_img
spot_img
spot_img

कासारवाडीत बेकायदा लोखंडी कोयता बाळगणारा तरुण अटकेत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घातक शस्त्र बाळगण्यास मनाई असताना बेकायदा लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला दापोडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे २०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील कासिम शेख (वय २९), रा. नागरे चाळ, विद्या विकास प्रशालेजवळ, कासारवाडी, पुणे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विलास शांताराम पवार (बक्कल क्रमांक ३२८४) यांनी फिर्याद दिली आहे. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी महादेव मंदिराजवळ, भोसरी-पिंपळे गुरव उड्डाणपुलाखाली, कासारवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपीने कोणताही परवाना नसताना लोखंडी कोयता बेकायदेशीररीत्या स्वतःजवळ बाळगल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई करणारा आदेश लागू असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. तसेच आरोपीविरुद्ध यापूर्वी हद्दपारीचा आदेश जारी करण्यात आल्याचा उल्लेखही पोलिसांनी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करून शस्त्र बाळगल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १४२, ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास दापोडी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!