शबनम न्यूज | प्रतिनिधी
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार अपमानित करणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून पतीविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी महिलेने पतीविरुद्ध तक्रार दिली आहे. आरोपी रोहित राधाकृष्ण जोशी (वय ३५) हा वाकड येथील कुबेर इम्पेरिया परिसरातील बी-५०२ या सदनिकेत राहतो.
तक्रारीनुसार, २७ डिसेंबर २०२१ पासून २० ऑक्टोबर २०२६ पर्यंतच्या कालावधीत आरोपी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी त्रास दिला. तसेच, फिर्यादी आणि तिच्या आई-वडिलांना तुच्छ लेखून अपमानित करणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे आणि हाताने मारहाण करणे असे प्रकार केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे फिर्यादीचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ८५, ११५(२), ३५१(२), ३५१(४), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.




Total Users : 232624