spot_img
spot_img
spot_img

कपड्याच्या दुकानात तरुणावर कोयत्याने वार; तिघांविरुद्ध गुन्हा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे येथील शिवाजी चौक परिसरात कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवेंद्र किशन जाधव, (रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) हे शिवाजी चौक परिसरातील कपड्याच्या दुकानात काम करत होते. त्यावेळी संबंधित तीन अल्पवयीन मुले दुकानात आली. त्यांच्यापैकी एकाने जीन्स पॅन्ट पाहण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या मागे वळण्याची संधी साधली. त्यानंतर फिर्यादीच्या डोक्यावर आणि मानेवर कोयत्याने वार करण्यात आल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून बालसुधारगृहातून बाहेर आल्यानंतर व्हॉट्सॲप स्टेटसवरून निर्माण झालेल्या रागातून हा हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), १२६(२), ३(५) तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!