शबनम न्यूज | प्रतिनिधी
साचापिर स्ट्रीट कॅम्प पुणे येथील श्री वैष्णव बनिया संस्थानच्या
श्री अष्टसिद्धी हनुमान मंदिरामध्ये शारदीय नवरात्री मध्ये महा नवमीच्या दिवशी कन्या पूजन आणि कन्या भोज करण्यात आले होते. या दिवशी लहान मुलींना साक्षात आदिमाया दुर्गा देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते. यावेळी कन्या पूजन मुलींना दक्षिणा म्हणून पैसे आणि भेटवस्तू देण्यात आले.
यावेळी श्री वैष्णव बनिया संस्थानचे सेक्रेटरी आशिष राजोरे, व्यवस्थापक सुशील खंडेलवाल, मॅनेजिंग ट्रस्टी श्याम राजोरे, रंजीत शुक्ला, आदी उपस्थित होते.




Total Users : 232386